मुंबई- दाक्षिणात्य अर्जून रेड्डी चित्रपटाचा रिमेक असणारा कबीर सिंग चित्रपट शुक्रवारी(आज) प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. एक वेगळ्या धाटणीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आल्यानं प्रेक्षकही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. आता या चित्रपटाबद्दलच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
VIDEO: कबीर सिंग चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
कबीर सिंग चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहून सिनेमागृहाबाहेर आलेल्या बहुतेक प्रेक्षकांनी शाहिदच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक केलं आहे.
कबीर सिंग चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
हा चित्रपट पाहून सिनेमागृहाबाहेर आलेल्या बहुतेक प्रेक्षकांनी शाहिदच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक केलं आहे. तर कियाराच्या वाट्याला चित्रपटात कमी डायलॉग आले असले तरीही तिनं आपल्या साध्या लूकनं आणि वाट्याला आलेला अभिनय उत्तमपणे साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
पब्लिक रिव्ह्यू -