मुंबई - बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा हिचे वडिल अशोक चोप्रा यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त प्रियांकाने एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची कमतरता प्रियांकाला आजही जाणवते. तिने शेअर केलेल्या पोस्टमधुन तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२०१३ साली अशोक चोप्रा यांचं निधन झालं होतं. नेहमी ती तिच्या वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर करत असते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त प्रियांकाने त्यांचा एक फोटो असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अशोक चोप्रा यांचे आवडतं गाणं 'कहां से लाई हो जाने मन ये किताबी चेहरा-गुलाबी आंखें', हे देखील ऐकायला मिळते.