महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

PHOTOS ''काय खरं काय खोटं'' : लंडनमध्ये शुटिंग करताना प्रियंका चोप्राच्या चेहऱ्याला दुखापत - अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास

प्रियंका चोप्रा लंडनमध्ये ‘सिटाडेल’ या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान जखमी झाले आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या कपाळावर जखमा दिसत असून तिच्या कपाळावर रक्त दिसत आहे.

प्रियंका चोप्रा जोनास
प्रियंका चोप्रा जोनास

By

Published : Aug 28, 2021, 4:08 PM IST

Updated : Aug 28, 2021, 6:34 PM IST

मुंबई - अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास लंडनमध्ये ‘सिटाडेल’ या हॉलिवूड चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान जखमी झाले आहे. प्रियंकाने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन या अपघाताची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते चिंतीत झाले आहेत.

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या कपाळावर जखमा दिसत असून तिच्या कपाळावर रक्त दिसत आहे. या फोटोला तिने. ''काय खरं काय खोटं'' असं कॅप्शन दिलंय. एका फोटोत तिच्या भुवयांवरही जखम झाल्याचे दिसते.

प्रियंका चोप्रा जोनास

प्रियांका चोप्रा जोनास गेली 8 महिने लंडनमध्ये ‘सिटाडेल’ या सिनेमाचं शूटिंग करतेय. या सिनेमात ती गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रिचर्ड मॅडेन आणि पेड्रो लिएंड्रो यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिटाडेलच्या पूर्वी तिने तिचा आंतरराष्ट्रीय चित्रपट टेक्स्ट फॉर यू पूर्ण केला आहे.

प्रियंका चोप्रा जोनास

प्रियंका चोप्रा जोनास ग्रॅमी-विजेता सेलिन डायोन आणि अभिनेता सॅम हेगेन यांच्यासोबत हॉलिवूडच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. हा एक नाट्यमय रोमँटिक चित्रपट आहे. हॉलिवूड सिनेमांसोबतच प्रियांका ‘जी ले जरा’ या बॉलिवूड सिनेमात आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत झळकणार आहे. अलिकडेच या सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. फरहान अख्तर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

हेही वाचा -'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चनचा 8 मिनीटांचा डायलॉग, ‘वन टेक’ शुट करुन 'बिग बी' यांनी केला विक्रम

Last Updated : Aug 28, 2021, 6:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details