मुंबई - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच एका मुलाची आई झाली आहे. प्रियांका आणि निक जोनास यांना सरोगसीच्या माध्यमातून अपत्य सुख मिळाले आहे. आता प्रियांका चोप्रा तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. प्रियांका चोप्रा आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. यावर सोशल मीडिया युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 22 जानेवारी रोजी सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले होते.
आई झाल्यानंतर प्रियांकाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. प्रियांकाचे हे फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'प्रकाश योग्य वाटतो.' पहिल्या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्यावरची चमक स्पष्ट दिसत आहे.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया