मुंबईः प्रियंका चोप्रा जोनास आज मनोरंजन क्षेत्रात दोन दशकांचा काळ पूर्ण करीत आहे. ती सर्व भारतीयांसाठी नेहमीच 'देसी गर्ल' राहिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या यशाची पताका फडकवत ठेवलेल्या प्रियंकाने आपल्या करियरच्या २० वर्षांचा आढवा घेतलाय. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय.
शनिवारी, प्रियंकाने तिच्या सोशल मीडियावर, कारकीर्दीचे अनेक महत्त्वाचे टप्प्पे उलगडून दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने २० वर्षामध्ये सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
व्हिडिओमध्ये प्रियंका म्हणते, "आपण स्वत: वर विश्वास ठेवल्यास जग आपल्यावर विश्वास ठेवेल," तिच्या करियरचा आलेखही तिच्या या शब्दांप्रमाणे आहे.