महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Single Movie Shooting Started : प्रथमेश-अभिनय-प्राजक्ता या तिकडीच्या 'सिंगल' चित्रपटाचे शूट झाले सुरु - new marathi movie

प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, अमोल कागणे 'सिंगल' (Single Movie Started ) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी आहे. या चित्रपटाची कथा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे.

Single
Single

By

Published : Mar 6, 2022, 3:38 PM IST

मुंबई -निर्माते किरण कुमावत आणि हर्षवर्धन गायकवाड निर्मित ‘सिंगल’ हा चित्रपट त्यातील तरुण कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता प्रथमेश परब, अभिनय बेर्डे आणि प्राजक्ता गायकवाड हे तिघे जण प्रेक्षकांच्या भेटीला येतील. 'सिंगल' चित्रपटात प्रथमेश परब, अभिनय बेर्डे आणि प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. याबाबत तिघांनीही बोलताना असे सांगितले की, “या चित्रपटाची उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती, नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. हा कॉमेडी चित्रपट आहे आणि आम्ही लवकरच प्रेक्षकांना हसवण्यास ‘सिंगल’ घेऊन येणार आहोत.”

सिंगल चित्रपट
प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, प्राजक्ता गायकवाड, अमोल कागणे 'सिंगल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाचा जॉनर कॉमेडी आहे. या चित्रपटाची कथा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांच्या जीवनावर आधारली आहे. आताची तरुण पिढी आणि त्यांचे विश्व याची धमाल मस्ती या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास लवकरच सज्ज होत आहे.
चित्रपटाचे शूटिंग झाले सुरू
हेही वाचा -विमानतळावर केक कापून जान्हवी कपूरचे सुरू झाले बर्थडे सेलेब्रिशन

ABOUT THE AUTHOR

...view details