मुंबई - भारत आणि पाकिस्तान यांच्या झालेल्या रविवारच्या सामन्याच्यावेळी अभिनेता सैफ अली खान आणि पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला मैदानावर दिसले होते. दोघेही भारतीय संघाची जर्सीमध्ये संघाला चिअर्स करीत होते. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री पूजा बेदीने अलायाचा फोटो शेअर करीत पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.
अलाया, सैफच्या व्हायरल फोटोवर काय म्हणाली पूजा बेदी ? - cricket match
पाक सामन्याच्यावेळी पूजा बेदीची मुलगी अलाया आणि सैफ अली खान मैदानावर दिसले होते. याची भरपूर चर्चा रंगली होती. याला उत्तर देणारी पोस्ट पूजा बेदीने लिहिली आहे.
पूजाने लिहिलंय, "लंडनमधील विश्वचषक सामन्याच्यावेळी सैफ अली खानसोबत माझी मुलगी अलाया. अलायाचा पदार्पणाचा चित्रपट 'जवानी जानेमन'ची शानदार सुरुवात. सैफ अली खान यात अलायाच्या वडिलाची भूमिका साकारत आहे. फोटोदेखील 'फादर्स डे'ला काढला होता. चांगल्या सुरुवातीसाठी शुभेच्छा."
'जवानी जानेमन' चित्रपटात सैफ अली खान अलायाच्या वडिलाची भूमिका करतोय. नितिन कक्कड हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती सैफ अली करीत आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.