मुंबई -बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास होळी साजरी करण्यासाठी भारतात आले होते. ईशा अंबानीच्या होळी सेलिब्रेशन पार्टीमध्ये दोघांनीही धमाल केली. तसेच होळीच्या रंगाचा आनंदही लुटला. आता दोघेही अमेरिकेला रवाना झाले आहेत.
होळी साजरी करुन निकसोबत प्रियांका अमेरिकेला रवाना - nick jonas celebrates holi in India
निक जोनासने प्रियांकासोबत पहिल्यांदाच भारतात होळी साजरी केली.
निक जोनासने प्रियांकासोबत पहिल्यांदाच भारतात होळी साजरी केली. त्याने प्रियांकासोबतचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. प्रियांकानेही होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, प्रियांका लवकरच नेटफ्लिक्सवरील 'वुई कॅन बी हिरो' आणि 'द व्हाईट टायगर' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रदर्शित होईल. रुसो ब्रदर्सने या सीरिजची निर्मिती केली आहे.