महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

निक-प्रियांकाचा घटस्फोट होणार? या प्रश्नावर परिणीती म्हणते... - priyanka chopra

अनेक माध्यमांनी त्यांचा संसार मोडणार असल्याचे वृत्त दिले आहे. अशात या वृत्तावर आता प्रियांकाची बहिण परिणीती चोप्राची प्रतिक्रिया आली आहे

निक-प्रियांकाच्या घटस्फोटावर परिणीतीची प्रतिक्रिया

By

Published : Apr 4, 2019, 3:19 PM IST

मुंबई- सध्या बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांमध्ये दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निकचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वीच निक आणि प्रियांकाने लग्नगाठ बांधली. मात्र, अवघ्या चार महिन्यातच हे दोघे एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

अनेक माध्यमांनी त्यांचा संसार मोडणार असल्याचे वृत्त दिले आहे. अशात या वृत्तावर आता प्रियांकाची बहिण परिणीती चोप्राची प्रतिक्रिया आली आहे. परिणीतीने या बातम्या पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे. यासोबतच मला या वृत्तावर काही प्रतिक्रिया द्यायची असती तर मी ट्विटवरूनच दिली असती. यासोबतच मी माझी प्रतिक्रिया माझ्या कुटुंबियांजवळ दिली असती. लोकांसमोर या विषयावर बोलण्याची मला गरज नसल्याचे तिने म्हटले आहे.

एकंदरीतच बहिणीच्या संसाराविषयी वाईट बोललेलं परिणीतीला अजिबातही आवडलेलं नाही. त्यामुळेच या अफवांमुळे संतापलेल्या परिणीतीनं या सर्व अफवा असल्याचे सांगण्यासोबतच अफवा पसरवणाऱ्यांनाही चांगलाच टोला लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details