मुंबई- इश्कजादे फेम अर्जुन कपूर लवकरच पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत- द ग्रेट बेट्रेयल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अर्जुन प्रचंड मेहनत घेत असून अनेकदा तो आपले व्हिडिओही शेअर करत असतो. अशात आता अर्जुनचा नवा लूक समोर आला आहे.
९ महिन्यांनंतर अर्जुनने केली ही गोष्ट; म्हणाला, बाल बाल बच गए - मोहनीश बहल
एका व्हिडिओमध्ये अर्जुन म्हणतोय, की माझा पानिपतमधील लूक लपवण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत मी कॅप घातली. आज अखेर माझ्या या सर्व कॅपचा शेवटचा दिवस आहे.
'पानिपत'मधील आपला लूक व्हायरल न होऊ देण्यासाठी अर्जुन गेल्या नऊ महिन्यांपासून मीडियासमोर डोक्यात कॅप घालूनच येत असे. आता त्याने स्वतःच इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या डोक्यातील कॅप काढताना दिसत आहे.
एका व्हिडिओमध्ये अर्जुन म्हणतोय, की माझा पानिपतमधील लूक लपवण्यासाठी १६ नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत मी कॅप घातली. आज अखेर माझ्या या सर्व कॅपचा शेवटचा दिवस आहे. कारण पानिपतचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो कॅप काढताना दिसत असून नऊ महिन्यांनतर...बाल बाल बच गए, असं कॅप्शन त्याने दिलं आहे. दरम्यान पानिपत चित्रपटात अर्जुन सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे. आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सेनॉन, पद्मीनी कोल्हापुरे आणि मोहनीश बहल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.