महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पल पल दिल के पास' या साहसी प्रेमकथेचा टीझर लवकरच भेटीला - पल पल

'पल पल दिल के पास' चित्रपटाचा टीझर येत्या सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करीत आहे.

पल पल दिल के पास

By

Published : Aug 3, 2019, 1:29 PM IST


मुंबई- बॉलिवूडमध्ये सतत नवनव्या प्रेमकथा येत असतात. आता 'पल पल दिल के पास' हा साहसी प्रेम कथा असलेला चित्रपट येतोय. या चित्रपटातून सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

'पल पल दिल के पास' या चित्रपटाचा टीझर येत्या सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करीत आहे. आपल्या मुलासाठी एक मजबूत कथा घेऊन सनी दिग्दर्शनाच्या मैदानात उतरलाय. करण देओल आणि सहर बम्बा ही जोडी या चित्रपटात झळकणार आहे.

झी स्टुडिओ आणि सनी साऊंड्स प्रायव्हेट लिमिटेड यांची संयुक्त निर्मिती असलेला 'पल पल दिल के पास' हा चित्रपट २० सप्टेंबर २०१९ ला प्रदर्शित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details