दिल्ली- दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी येऊन थडकले आहेत. नवीन कृषी कायदा रद्द करा या मागणीसाठी गेली १२ दिवस त्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना समाजातील विविध थरातून पाठिंबा मिळत चाललाय. मनोरंजन जगतही यात मागे नाही. अनेक कलाकार शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोशल मीडियावर आपली मते व्यक्त करीत आहे. या यादीत आता अभिनेत्री प्रियांका चोप्राही सहभागी झाली आहे.
पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसंझ या आंदोलनास स्वतः सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. या आंदोलनात सर्व धर्माचे लोक सहभागी झाले असून शांततेने हे आंदोलन सुरू असल्याचे आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना प्रसिध्दी देण्याचे आवाहन त्याने शेतकऱ्यांसमोर बोलताना केले होते. त्याने एक ट्विट केले आहे. यात दोन फोटो दिसतात. एका फोटोत आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची एक पंगत दिसत असून त्यांना जेवण वाढण्याचे काम अन्नदाता असलेले शेतकरी करीत असल्याचे दिसते. दुसऱ्या फोटोत शेतकऱ्यांना पोलीस जेवण वाढत असल्याचे दिसते.
हेही वाचा -ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरचे निधन