मुंबई - बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. चित्रपटात संजयच्या खास मित्राची भूमिका साकारलेल्या विकी कौशलनं या निमित्तानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
'संजू'ला एक वर्ष पूर्ण, विकी कौशलनं शेअर केली पोस्ट - sanjay dutt
संजू चित्रपटाला एक वर्ष पूर्ण. चित्रपटात संजयच्या खास मित्राची भूमिका साकारलेल्या विकी कौशलनं या निमित्तानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
संजू चित्रपटाला एक वर्ष पूर्ण. या चित्रपटामुळे पहिल्यांदा लोकांनी मला माझ्या पात्राच्या नावावरून ओळखण्यास सुरुवात झाली. तुमच्या या प्रेमासाठी खूप खूप आभार, असे म्हणत हा चित्रपट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं विकीनं म्हटलं आहे.
दरम्यान या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. तर सोनम कपूर, अनुष्का शर्मा, मनीषा कोयराला आणि परेश रावल या कलाकारांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. राजकुमार हिराणी यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम रचले होते.