मुंबई- कॉलेजमधील ग्रुप फ्रेंडशिपवर आधारित छिछोरे सिनेमा लवकरच तरुणांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
छिछोरेचा नवा व्हिडिओ तुम्हाला करुन देईल कॉलेजमधील दिवसांची आठवण - कॉलेज
आता सिनेमातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. २२ सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हालाही तुमच्या कॉलेजमधील दिवसांची आठवण करुन देईल, हे नक्की. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे
यानंतर आता सिनेमातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. २२ सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हालाही तुमच्या कॉलेजमधील दिवसांची आठवण करुन देईल, हे नक्की. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. भेटा हॉस्टेल ४च्या कमीन्यांना, म्हणजेच आमच्या छिछोऱयांना, असं त्यांनी व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
या सिनेमात सुशांत सिंग अनी नावाचं पात्र साकारणार आहे. तर श्रद्धानं यात माया नावाचं पात्र साकारलं आहे. या सिनेमात सुशांत आणि श्रद्धाशिवाय वरुण शर्मा, नवीन शेट्टी, सहर्ष कुमार, ताहिर राज भसीन, तुषार पांडे आणि प्रतीक बब्बर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.