महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मेरे सोनेया'! कियारा-शाहिदची लव्ह केमिस्ट्री, 'कबीर सिंग'मधील तिसरं गाणं प्रदर्शित - kiara advani

दोन मिनीटांच्या या गाण्यात शाहिद आणि कियाराची खास लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चित्रपटातील आधीच्या दोन्ही भावनिक गाण्यांनंतर हे लव्ह साँग प्रदर्शित करण्यात आलंय.

'कबीर सिंग'मधील तिसरं गाणं प्रदर्शित

By

Published : Jun 7, 2019, 5:18 PM IST

मुंबई- शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. याआधी चित्रपटातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 'बेख्याली' आणि 'तुझे कितना चाहने लगे हम' या गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर आता चित्रपटातील तिसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

दोन मिनीटांच्या या गाण्यात शाहिद आणि कियाराची खास लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. चित्रपटातील आधीच्या दोन्ही भावनिक गाण्यांनंतर हे लव्ह साँग प्रदर्शित करण्यात आलंय. सचेत टंडन यांनी आपल्या आवाजानं या गाण्याला अधिक खास बनवलं आहे. तर सचेत आणि परंपरा यांनीच गाण्याची मांडणी केली आहे.

'मेरे सोनेया वे मेरा कैथे नैयो दिल लगदा', असं शीर्षक असलेल्या या गाण्यात हे कपल वेगवेगळ्या लोकेशन्सवर क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. संदीप वंगा रेड्डी हे कबीर सिंग चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून हा दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. येत्या २१ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details