मुंबई- अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे रिअल लाईफ कपल लवकरच पडद्यावरही प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ही जोडी स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, चित्रपटाची बरीच कामं अजून बाकी असल्याने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
'ब्रह्मास्त्र'च्या रिलीज डेटमध्ये बदल, आता २०२० मध्ये होणार प्रदर्शित - ranbir kapoor
अयान मुखर्जींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. हा चित्रपट २०१९ ला नाताळाच्या दिवशी प्रदर्शित होणार होता
अयान मुखर्जींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. हा चित्रपट २०१९ ला नाताळाच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता २०२० च्या उन्हाळ्यात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तर प्रदर्शनाची नेमकी तारीख अद्याप घोषित करण्यात आली नसून लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होईल, असेही अयानने म्हटले आहे. चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून ही कथा लिहिण्यासाठी त्यांना तब्बल ५ वर्षे लागले होते.