मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूरचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'साहो' सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. उत्कंठा वाढवणाऱ्या या ट्रेलरनंतर आता श्रद्धा आणि प्रभासची रोमँटीक केमिस्ट्री दाखवणारं चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'साहो'चं नवं पोस्टर प्रदर्शित, श्रद्धा-प्रभासचा रोमँटीक अंदाज - प्री रिलीज इव्हेंट
श्रद्धा आणि प्रभासची रोमँटीक केमिस्ट्री दाखवणारं चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. बाहुबली स्टार प्रभासनं आपल्या इन्स्टाग्रामवरून हे पोस्टर शेअर करत, अॅक्शन, रोमान्स आणि खूप काही...असं कॅप्शन दिलं आहे
बाहुबली स्टार प्रभासनं आपल्या इन्स्टाग्रामवरून हे पोस्टर शेअर करत, अॅक्शन, रोमान्स आणि खूप काही...असं कॅप्शन दिलं आहे. या सिनेमात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मुरली शर्मा, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
दरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी येथे सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटचं आज आयोजन करण्यात आलं. प्रभासच्या चाहत्यांनी या इव्हेंटसाठी तुफान गर्दी केली आहे. साहो चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम भाषेत येत्या ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.