मुंबई- अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा दाक्षिणात्य 'अर्जून रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यातील शाहिदच्या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
'कबीर सिंग'चं नवं पोस्टर प्रदर्शित, पाहा शाहिदचा खास लूक - kiara advani
आता चित्रपटाचं आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात शाहिदचा नवा लूक पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे.
अशात आता चित्रपटाचं आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात शाहिदचा नवा लूक पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. यात शाहिदच्या अपोझिट अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे. तर मुळ अर्जून रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वंगा या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहेत.
येत्या २१ जूनला म्हणजेच दोन महिन्यांनी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर सिंग हा यशस्वी मेडिकल सर्जन असतो. मात्र जेव्हा त्याच्या प्रियसीचे लग्न बळजबरीने तिच्या मनाविरुध्द लावले जाणार असते तेव्हा हा डॉक्टर आक्रमक होतो. त्याच्या बिनधास्तपणाची ही कथा असणार असल्याचे म्हटले जात आहे.