महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 30, 2021, 4:00 PM IST

ETV Bharat / sitara

अकल्‍पनीय गुन्‍ह्यांमागील रहस्‍यांचा उलगडा करणार ‘३ राजकारणी-ॲक्टर्स’ 'मौका-ए-वारदात' मधून!

मनोज तिवारी, रवी किशन आणि सपना चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेली साप्‍ताहिक क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात' एण्‍ड टीव्‍हीवर सुरू होत आहे. मेकर्सनी अनेक महिन्‍यांपासून विविध कथांच्‍या बाबतीत सखोल संशोधन केले आहे ज्यातून सर्वात काल्‍पनिक व रोमांचपूर्ण गुन्‍हेगारी रहस्‍य सादर करण्‍यात येणार आहे.

'Mouka-e-Wardat' on & TV
'मौका-ए-वारदात'

मनोज तिवारी, रवी किशन आणि सपना चौधरी ही मनोरंजनक्षेत्रातील तीन मोठी नाव जी आता राजकारणातही सक्रिय झालीयेत. हे तिघे आता अकल्‍पनीय गुन्‍ह्यांमागील रहस्‍यांचा उलगडा करणार आहेत एण्‍ड टीव्‍हीवरील 'मौका-ए-वारदात' या लक्षवेधक क्राइम मालिकेतून. गुन्‍हेगारी विश्‍वातील दोन गोष्टी म्‍हणजे शक्‍य व अशक्‍य. ही मालिका 'वास्‍तविकता काल्‍पनिकतेपेक्षाही विलक्षण असते' या वक्‍तव्यावर विश्‍वास ठेवण्‍यास भाग पाडेल. कल्‍पनाशक्‍तीला आव्‍हान करणा-या आणि प्रेक्षकांना अबोल करणा-या अशक्‍य गुन्‍ह्यांच्‍या असाधारण कथा नवीन लक्षेवधक साप्‍ताहिक क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात' मधून प्रेक्षकांसमोर येतील.

सपना चौधरी
मेकर्सनी अनेक महिन्‍यांपासून विविध कथांच्‍या बाबतीत सखोल संशोधन केले आहे ज्यातून सर्वात काल्‍पनिक व रोमांचपूर्ण गुन्‍हेगारी रहस्‍य सादर करण्‍यात येणार आहे. या नवीन मालिकेबाबत बोलताना एण्‍ड टीव्‍हीचे व्‍यवसाय प्रमुख विष्‍णू शंकर म्‍हणाले, 'पहिल्‍यांदाच आम्‍ही अशा प्रकारची मालिका सादर करत आहोत, जी सर्वात विलक्षण व अशक्‍य गुन्‍ह्यांना दाखवते. आम्‍हाला एण्‍ड टीव्‍हीवर लक्षवेधक साप्‍ताहिक क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात' सादर करण्‍यात आनंद होत आहे. वास्‍तविक जीवनातील घटनांमधून प्रेरित या काल्‍पनिक कथा प्रेक्षकांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला आव्‍हान करतील.''
रवी किशन
अस्‍सल लोकेशनच्या पार्श्‍वभूमीवर आधारित 'मौका-ए-वारदात' मालिका सर्वात अकल्‍पनीय गुन्‍ह्यांच्‍या विविध कथांना सादर करेल आणि त्‍यामागील दृष्टिकोन व गुन्‍हेपद्धतींना दर्शवेल. प्रत्‍येक कथा प्रबळ साप्‍ताहिक एपिसोडने भरलेली असेल. वास्‍तविक घटनांमधून प्रेरित सर्वात रोमांचक व रहस्‍यमय गुन्‍हेगारी कथांचा समावेश आहे ज्‍यामधून प्रेक्षकांना सर्वात अनपेक्षित घटनांसह रोमांचपूर्ण अनुभव मिळेल. या मालिकेमध्‍ये मुख्‍य भूमिका महिलेची आहे, जी विलक्षण गुन्‍ह्यांमागील रहस्‍यांचा उलगडा करण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल. सपना चौधरी म्‍हणाली, ''मौका-ए-वारदात मालिकेमध्ये प्रमुख महिला पात्राच्‍या दृष्टिकोनातून कथाकथन करण्यात आले आहे, जी या मालिकेबाबत मला लक्षणीय बाब वाटली. हे पात्र या अकल्‍पनीय गुन्‍ह्यांमागील रहस्‍यांचा उलगडा करेल, जी या मालिकेची खासियत आहे आणि मालिका पाहण्‍यासाठी रोमांचक बाब आहे.''
मनोज तिवारी
रवीराज क्रिएशन्‍सचे निर्माता व दिग्‍दर्शक रवीराज महतो म्‍हणाले, ''मौका-ए-वारदात'साठी निवडण्‍यात आलेल्‍या कथा सर्वात रोमांचक व रहस्‍यमय वास्‍तविक जीवनातील घटनांमधून प्रेरित आहेत. या कथा प्रेक्षकांच्‍या संवदेनशीलतेला आव्‍हान करतील आणि घटनांच्‍या सर्वात अनपेक्षित प्रसंगांसह त्‍यांना रोमांचक अनुभव देतील.'' मनोज तिवारी म्‍हणाला, ''मला या मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. 'मौका-ए-वारदात' ही मालिका कल्‍पनेपलीकडील असून विश्‍वासापलीकडे असलेल्‍या गुन्‍ह्यातील रहस्‍यांना सादर करते आणि लोकांना विचार करण्‍यास भाग पाडते की 'हे असे कसे झाले?'” रवी किशन म्‍हणाला, ''दररोज आपण आसपास अनेक गुन्‍हे घडल्‍याचे वाचतो किंवा त्‍याबाबत ऐकायला मिळते. अशा घटना निश्चितच त्रासदायक आहेत, पण काही घटना धक्‍कादायक व आश्‍चर्यचकित करतात. त्‍यामधील दुष्‍टपणासोबत प्रश्‍न पडतो की असा अशक्‍य गुन्‍हा कसा घडला? मी विविध मालिकांचा भाग राहिलो आहे, पण 'मौका-ए-वारदात'ची संकल्‍पना सर्वात अविश्‍वसनीय गुन्‍ह्यांच्‍या लक्षवेधक कथांमुळे पूर्णत: नवीन आहे.'' रवीराज क्रिएशन्‍स, हेमंत प्रभु स्‍टुडिओज, ए अँड आय प्रॉडक्‍शन्‍स आणि स्‍पेसवॉकर फिल्‍म्‍स निर्मित 'मौका-ए-वारदात' सुरू होत आहे ९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता एण्‍ड टीव्‍हीवर आणि दर सोमवार ते शुक्रवार प्रसारित होईल.हेही वाचा - ऋषी कपूर अजिबात चांगला डान्सर नव्हता आणि रणबीर अतिशय वाईट गातो : नीतू कपूर!

ABOUT THE AUTHOR

...view details