मुंबई- चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप अमेरिकन उद्योजकासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तो एक उद्योजक असण्याबरोबरच यु ट्यूबरही आहे. या सुंदर प्रियकराचे नाव आहे शेन ग्रेगोइर. आलिया मागील वर्षापासून शेनबरोबरचे प्रेमातील फोटो शेअर करत आहे. शेन आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यात एक विलक्षण साम्य दिसून आल्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर नेटीझन्सचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दोघांचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.
२०१२ मध्ये आलियाने आपले यूट्यूब चॅनल लॉन्च केले होते. लाईफ स्टाईल, फॅशन आणि ब्युटी व्हीलॉग्सचे व्हिडिओ ते तयार करतात. २जानेवारी, २०२१ रोजी तिच्या चॅनेलचे तीन लाख ग्राहक आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, आलियाने एक व्हिडिओ बनविला होता ज्यामध्ये ती तिच्या प्रियकराला प्रश्न विचारत असल्याचे दिसून येत आहे. मुली सहसा मुलाला विचारणे टाळतात. व्हिडिओने तिच्या चॅनेलवर एक लाखाहून अधिक व्यव्ह्ज मिळविले आहेत. परंतु कंटेंट पेक्षा लोकांनी शेन सैफसारखा दिसतो म्हणून व्हिडिओ पाहिल्याचे बोलले जाते.
दरम्यान, अनुरागने एका जुन्या मुलाखतीत आलियाला अभिनय करण्याची स्वप्ने असल्याचेही शेअर केले होते. जर तिला अभिनेत्री व्हायचं असेल तर तिला रितसर ऑडिशन द्यावी लागेल असे तो म्हणाला होता.