महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

..असे क्षण सगळा ताण विसरायला लावतात, नीतूकडून आलिया-रणबीर जोडीचं कौतुक - रणबीर कपूर

नुकतंच या कपलने फिल्मफेअर अॅवॉर्ड २०१९ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी हे कपल एकमेकांचे हात हातात घेऊनच दिसलं

आलिया-रणबीरच्या जोडीचं नीतू कपूरकडून कौतुक

By

Published : Mar 27, 2019, 1:19 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याविषयीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच जोर धरून आहेत. अशात नुकतंच या कपलने फिल्मफेअर अॅवॉर्ड २०१९ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी हे कपल एकमेकांचे हात हातात घेऊनच दिसलं. आता रणबीरची आई नीतू कपूरनंही या जोडीचं कौतुक केलं आहे.

रणबीरला या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नीतू कपूरनं दोघांचा अॅवॉर्ड हातात घेतलेला एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. असे क्षण हे खरंच सगळा ताण विसरायला भाग पाडतात, असे म्हणत नीतूनं आलिया आणि रणबीरचे अभिनंदन केले आहे.

रणबीरच्या 'संजू' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर छाप उमटवण्यासोबतच आपल्या अभिनयानंही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर आलियानंही 'राझी' चित्रपटातून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयानं भूरळ घातली होती. याच चित्रपटांसाठी दोघांनाही सन्मानित करण्यात आले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details