महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवाज बनणार गायक, 'बोले चुडिया'मधील रॅप साँगला देणार आवाज - next film

नवाज स्वतःच्याच 'बोले चुडिया' चित्रपटासाठी गाणार आहे. 'स्वॅगी चुडिया' या रॅप साँगला तो आवाज देणार आहे. त्यामुळे अभिनयासोबत नवाजच्या चाहत्यांना आता त्याच्या आवाजाचीही जादू अनुभवायला मिळणार आहे.

नवाज बनणार गायक

By

Published : Jul 13, 2019, 4:45 PM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने छाप उमटवणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच गायकही बनणार आहे. आता नवाजुद्दीन गाणं गाणार म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही गोड बातमी असणार. हे गाणं तो इतर कोणत्या नाही तर स्वतःच्याच 'बोले चुडिया' चित्रपटासाठी गाणार आहे.

या चित्रपटातील 'स्वॅगी चुडिया' या रॅप साँगला तो आवाज देणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे अभिनयासोबत नवाजच्या चाहत्यांना आता त्याच्या आवाजाचीही जादू अनुभवायला मिळणार आहे.

'बोले चुडिया' या चित्रपटात नवाजच्या अपोझिट अभिनेत्री तमन्ना भाटिया झळकणार आहे. सुरूवातीला या चित्रपटात मौनी रॉयची वर्णी लागली होती. मात्र, काही कारणांमुळे चित्रपटातून तिचा पत्ता कट करण्यात आला. ज्यानंतर याठिकाणी तमन्नाची वर्णी लागली. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शम्स नवाज सिद्दीकी करणार असून राजेश आणि किरण भाटिया यांची निर्मिती असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details