मुंबई- वनराज भाटिया यांनी गोविंद निहलानींच्या 'तमस' चित्रपटातील गाण्याला संगीत दिलं होतं. त्यांना १९८८ साली 'तमस'च्या संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं आहे. आपल्या अप्रतिम कामाची छाप भारतीय सिनेसृष्टीत पाडणारे म्यूजिक कंपोजर वनराज आज अतिशय कठिण परिस्थितीचा सामना करत आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री वनराज भाटियांवर उपासमारीची वेळ - 36 chowringhee lane
वनराज हे सध्या ९२ वर्षाचे असून त्यांच्या बँक खात्यात एक रुपयादेखील नाही. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, माझ्या अकाऊंटमध्ये सध्या १ रुपयादेखील नाहीये. अशात ते गुडघेदुखीसारख्या समस्यांचाही सामना करत आहेत
वनराज हे सध्या ९२ वर्षाचे असून त्यांच्या बँक खात्यात एक रुपयादेखील नाही. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, माझ्या अकाऊंटमध्ये सध्या १ रुपयादेखील नाहीये. अशात ते गुडघेदुखीसारख्या समस्यांचाही सामना करत आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे, की त्यांना जिवंत राहण्यासाठीदेखील आपल्या घरातील भांडी आणि इतर साहित्य विकावं लागत आहे.
भाटिया हे १९७४ मधील चित्रपट 'अंकुर'पासून १९९६च्या 'जाने भी दो यारो'पर्यंत दिग्दर्शक आणि आर्टिस्ट श्याम बेनेगल यांचे आवडते म्यूजिक कंपोजर होते. या दोघांनी 'मंथन', 'भूमिका', 'जुनून', 'कलयुग', 'मंडी', 'त्रिकाल' आणि 'सुरज का सातवां घोडा'सारख्या अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं आहे.