मुंबईः 'माय मेलबर्न' चित्रपटासाठी चित्रपट निर्माते कबीर खान, इम्तियाज अली, रीमा दास आणि ओनीर एक टीम म्हणून एकत्र आले आहेत.
ही चौकडी निवडक व्हिक्टोरियन फिल्म मेकिंग टीमसमवेत काम करेल. ते अपंगत्व, लैंगिकता आणि लिंग यासारख्या लघुपटांचे शूटींग करणार आहेत. त्यानंतर या लघुपटांचे संकलन 'माय मेलबर्न' या चित्रपटामध्ये केले जाईल. पुढील वर्षी इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (आयएफएफएम) येथे या चित्रपटाचा प्रीमियर होईल.
आयएफएफएम फेस्टिव्हलचे डायरेक्टर मितू भौमिक लैंगे म्हणाले, "हा एक उत्साहवर्धक उपक्रम आहे. आयएफएफएमने आपल्या कार्यशाळेत भारताच्या स्वतंत्र सिनेमातील चार वेगवेगळ्या लोकांना सामील करून घेतल्यामुळे मला आनंद झाला ."
फेस्टीव्हलसाठी कथांना आमंत्रित केले जाईल व चार टीममध्ये त्या विभागल्या जातील. यासाठी बजेट देण्यात येईल व मूळ स्त्रिप्टवर काम केले जाईल.
कबीर, इम्तियाज, रीमा आणि ओनीर कार्यशाळेत निवडक कथा विकसित करतील आणि झूमच्या माध्यमातून या टीमच्या पूर्व-निर्मिती कामाची देखरेख करतील. प्रवासावरील निर्बंध हटवल्याने हे चारही चित्रपट निर्माते मेलबर्न येथे चित्रपटांच्या शूटिंगसाठी जातील.