मुंबई - क्रूझ पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan's son Aryan Khan)ला अटक करण्यात आले होते. आर्यन खान (Aryan Khan) या प्रकरणातील सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केला होता. त्यामध्ये सॅम डिसोझा यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आज क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणी (Cruise ship drug case) सॅम डिसोझा (Sam D'Souza) सोमवारी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर झाला. या प्रकरणात डिसोझाचे नाव पेमेंटच्या आरोपात पुढे आले होते.
प्रभाकर साईलने गेल्या महिन्यात दावा केला होता की NCB ने आर्यन खानला अटक केल्यानंतर NCB चा साक्षीदार केपी गोसावीने (KP Gosavi) डिसोझासोबत 25 कोटी रुपयांच्या पेमेंट डीलबाबत फोनवर चर्चा करताना ऐकले होते. या प्रकरणाशी संबंधित NCB अधिकार्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नंतर SIT स्थापन केली.