महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बच्चन साहेबांच्या 'जलसा' बंगल्यातही शिरले होते पाणी, व्हिडिओ व्हायरल - गुलाबो-सिताबो

मुंबईतल्या पावसाचा जोर वाढत गेला तशी रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. सामान्यांपासून सेलेब्रिटींना या पावसाचा दणका बसला. अशीच झळ बिग बी अमिताभ यांनीही बसल्याचे दिसते.

अमिताभ यांचा जलसा बंगला

By

Published : Sep 5, 2019, 5:58 PM IST


मुंबई - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. रेल्वेलाईन बंद पडल्यानंतर रस्ते मार्गाने होणारी वाहतुकही कोलमडली. जसजसा पावसाचा जोर वाढत गेला तशी रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. सामान्यांपासून सेलेब्रिटींना या पावसाचा दणका बसला.

अनेक मराठी कलाकार शूटींगसाठी घरातून बाहेर पडले मात्र त्यांना स्टुडिओत पोहोचता आले नाही. अशीच झळ बिग बी अमिताभ यांनीही बसल्याचे दिसते.

अमिताभ यांचा जलसा हा बंगला लोक लांबूनही ओळखतात. या बंगल्यामध्ये पाणी शिरले होते. जलसाच्या बाहेरील रस्त्यावरही पाणी भरले होते. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत एक दुचाकीस्वाराची गाडी बंद पडली असून तो सहकाऱ्यांच्या मदतीने ढकलताना दिसतो. नेमका हा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर असल्यामुळे तो व्हायरल झाला आहे.

अमिताभ बच्चन आगामी ब्रह्मास्त्र, झूंड, गुलाबो-सिताबो आणि चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या ते कौन बनेगा करोडपती या शोचे अँकरींग करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details