मुंबई- अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत यांच्या मुख्य भूमिका असलेला दे दे प्यार दे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तब्बू आणि अजयच्या जोडीमुळे चांगलाच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मुखडा वेख के, असं या गाण्याचं शीर्षक आहे.
'मुखडा वेख के'! 'दे दे प्यार दे'मधील नवं गाणं प्रदर्शित - rakul preet
चित्रपटातील हे गाणं प्रेक्षकांनाही थिरकायला भाग पाडणारं आहे. भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे
या गाण्यात चित्रपटाची स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यासोबतच रकुल, अजय आणि तब्बू यांची केमिस्ट्रीही यात पाहायला मिळत आहे. या गाण्याला मिका सिंग आणि धवानी विनोद यांनी आवाज दिला आहे, तर टी सीरिज आणि लव्ह फिल्मस् यांची निर्मिती आहे.
चित्रपटातील हे गाणं प्रेक्षकांनाही थिरकायला भाग पाडणारं आहे. भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचं २६ वर्षाच्या तरूणीचं पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट येत्या १७ तारखेला प्रदर्शित होणार आहे.