मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्टअवेटेड सिनेमा 'बच्चन पांडे' आता 18 मार्च 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टि्वटरवरून माहिती दिली आहे. अक्षय कुमार या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित केला असून साजिद नाडियाडवालाने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे'मध्ये हटके लूक असून या लूकमध्ये अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या नावावरुनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटामध्ये अॅक्शनचा भरणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर अक्षय आणि कृती सेनॉन पुन्हा एकत्र दिसतील. हाऊसफुल 4 मध्ये कृतीने अक्षयची कोस्टार म्हणून काम केले होते. बच्चन पांडेमध्ये कृती एका पत्रकाराच्या भूमिकेत असणार आहे. तसेच चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी आणि अर्षद वारसी यांचीही भूमिका असणार आहे.