मुंबई- आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची कथा असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण यात दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांना एकाच चित्रपटात पाहण्याची अनोखी पर्वणी भारतीय सिने रसिकांना मिळणार आहे.
'सैरा नरसिम्हा रेड्डी'चं मोशन पोस्टर, ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज - big budget upcoming movie
काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा सुरु झाली आहे. या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर १८ सप्टेंबरला म्हणजेच येत्या २ दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा सुरु झाली आहे. या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर १८ सप्टेंबरला म्हणजेच येत्या २ दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं एक मोशन पोस्टर शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
या पोस्टरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांची झलक पाहायला मिळत आहे. हा सिनेमा येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसह, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्ल्याळम या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.