मुंबई- आजचा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच खास दिवसाच्या निमित्ताने सर्वच आपल्या आईला भावनिक पोस्ट शेअर करत शुभेच्छा देत आहेत. अशात अनेक कलाकारांनीही आपल्या आईचे फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिले आहेत.
जान्हवीपासून श्रद्धापर्यंत या कलाकारांनी शेअर केले आईसोबतचे फोटो, दिलं खास कॅप्शन - sonam kapoor
अभिनेत्री क्रिती सेनॉनने आईसोबतचा एक फोटो शेअर करत देवाची सर्वात सुंदर कलाकृती असं कॅप्शन दिलं आहे. श्रद्धानेही आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत माझं आयुष्य आणि सर्वकाही असं म्हणत खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री साराने आई अमृता सिंगचा फोटो शेअर करत माझी ताकत, स्फूर्ती आणि प्रेरणा म्हणून नेहमी माझ्यासोबत उभं राहण्यासाठी धन्यवाद असं म्हणत अमृताला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर सोहा अली खानचा पती कुणाल खेमूने सोहा आणि आपल्या आईचा फोटो शेअर करत माझी आई आणि माझ्या बाळाच्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा असे कॅप्शन दिले आहे.
तर अभिनेत्री क्रिती सेनॉनने आईसोबतचा एक फोटो शेअर करत देवाची सर्वात सुंदर कलाकृती असं कॅप्शन दिलं आहे. श्रद्धानेही आईसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर करत माझं आयुष्य आणि सर्वकाही असं म्हणत खास पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या सर्वात लक्ष वेधून घेतलं ते जान्हवी कपूरच्या पोस्टने जान्हवीने आई श्रीदेवींसोबतचा लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिची काळजी घ्या, तिचं ऐका आणि जगात जितकं प्रेम आहे सर्व तिला द्या, असं भावनिक कॅप्शन जान्हवीने या पोस्टला दिलं आहे.