मुंबई- भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या मोहिमेची कथा पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. अशात आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'मिशन मंगल' ट्रेलर: केवळ कथा नाही तर भारताचं एक स्वप्न - taapsee pannu
मंगळ मोहिमेची सुरूवात करताना येणाऱ्या अडचणी, प्रत्येकाच्या ओठी असलेला अशक्य शब्द आणि सामान्य व्यक्तींचा असामान्य प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
मंगळ मोहिमेची सुरूवात करताना येणाऱ्या अडचणी, प्रत्येकाच्या ओठी असलेला अशक्य शब्द आणि सामान्य व्यक्तींचा असामान्य प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अक्षयने या चित्रपटात मिशन मंगल मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या राकेश धवन यांची भूमिका साकारली आहे.
ट्रेलरमध्ये अक्षय प्रत्येकाच्या अशक्य शब्दाला सकारात्मक विचार देऊन त्यांचं मतपरिवर्तन करताना दिसत आहे. चित्रपटात सोनाक्षी, सिन्हा, तापसी पन्नू, विद्या बालन, शर्मन जोशी, कृति कुल्हारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.