मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हेरगिरी थ्रिलर मिशन मजनू आता 10 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मिशन मजनू हा मंदान्नाचा हिंदी चित्रपटसृष्टील पदार्पणाचा चित्रपट आहे. अलीकडेच रश्मिका मंदान्नाने तेलुगु ब्लॉकबस्टर पुष्पा मध्ये भूमिका केली होती.
शंतनू बागची दिग्दर्शित मिशन मजनू या 1970 च्या दशकातील हेरगिरी थ्रिलरमध्ये सिध्दार्थ मल्होत्रा हा RAW एजंटच्या भूमिकेत आहे, जो पाकिस्तानच्या भूमीवर गुप्त ऑपरेशनचे नेतृत्व करतो. हा चित्रपट यापूर्वी 13 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. चित्रपटाच्या नवीन रिलीज तारखेची बातमी प्रॉडक्शन बॅनर RSVP ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे.