महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मीरा कपूरने शेअर केला 'शाहिद-इशान'चा डान्स व्हिडिओ, अनन्याची 'हटके' प्रतिक्रिया - अनन्या पांडे

मीरा कपूरने शाहिद कपूर आणि ईशान खट्टर यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ईशानची कथित मैत्रीण असल्याची चर्चा असलेल्या अनन्या पांडेने पोस्टवर कॉमेंट करीत लिहिलंय, हे चिली पनीर आहे. तिने व्हिडिओला "Viiiiiiiibe" अशीही कॉमेंट केली आहे. मीरा कपूरने शेअर केला शाहिद-इशानचा डान्स व्हिडिओ, अनन्याची हटके प्रतिक्रिया

'शाहिद-इशान'चा डान्स व्हिडिओ
'शाहिद-इशान'चा डान्स व्हिडिओ

By

Published : Aug 17, 2021, 5:07 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर फिल्म इंडस्ट्रीमधील एक उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो. सोमवारी शाहिदने भाऊ इशान खट्टरसोबत धमाल डान्स केला. शाहिद आणि ईशानने ट्रॉय सिव्हन्स रेगर्डवर या व्हिडिओमध्ये डान्स केलाय. हा व्हिडिओ शाहिदची पत्नी मीरा राजपूतने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात शाहिद इशानसोबत स्टेप्स जुळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना मीराने लिहिलंय, "लेस ट्विन्स." आता तुम्ही म्हणाला हे लेस ट्विन्स काय आहे? तर लॉरेन्ट आणि लॅरी निकोलस बुर्जुआ या फ्रेंच बंधूंना लेस ट्विन्स या नावाने ओळखले जाते. ते उत्तम डान्सर्स आणि कोरिओग्राफर्स आहेत. ईशानची कथित मैत्रीण असल्याची चर्चा असलेल्या अनन्या पांडेने पोस्टवर कॉमेंट करीत लिहिलंय, हे चिली पनीर आहे. तिने व्हिडिओला "Viiiiiiiibe" अशीही कॉमेंट केली आहे.

शाहिद हा उत्तम डान्सर आहे हे आपण जाणता. त्याने कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्या ग्रुपमध्ये डान्सर म्हणून काम केले आहे. सुक्षाष घई यांच्या ताल या सिनेमात ऐश्वर्या रायच्या मागे शाहिद डान्स करताना दिसला होता.

शाहिदचा भाऊ इशान खट्टर हा देखील चांगला डान्सर असून तो सोशल मीडियावर नियमितपणे व्हिडिओ शेअर करीत असतो. शाहिद हा वडील पंकज कपूर आणि आई निलीमा अजीमचा मुलगा आहे तर इशान हा वडील राजेश खट्टर आणि आई निलीमा अजीमचा मुलगा आहे.

चित्रपटाच्या आघाडीवर शाहिद आगामी 'जर्सी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा 2019 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या तेलुगु हिटचा हिंदी रिमेक आहे. ही कथा अर्जुन नावाच्या प्रतिभावान पण अपयशी क्रिकेटपटूची आहे. तो आपल्या मुलाच्या इच्छेखातर वयाच्या तिशीनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरतो. त्याशिवाय शाहिद कपूर आगामी राज आणि डीके दिग्दर्शित आगामी गुप्तचर मालिकेत दिसणार आहे.

ईशान 'फोन भूत' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेता कॅटरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही प्रमुख भूमिका असतील.

हेही वाचा - 'फॅक्टरी' टिझर रिलीज : आता तरी मिळणार का आमिर खानच्या 'सख्ख्या' भावाला यश?

ABOUT THE AUTHOR

...view details