मुंबई- नुकताच लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकांत भाजपने घसघशीत यश मिळवले. यानंतर मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच महेश भट्ट यांनी मोदींविरोधात केलेल्या ट्विटमुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.
ये जलन है कोई जज्बात नहीं, मोदींविरोधातील त्या ट्विटमुळे महेश भट्ट ट्रोल
महेश भट्ट यांनी मोदींबद्दलचा एक लेख शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. ऐसे दस्तूर को, सुबहे बेनूर को, मैं नहीं मानता, मैं नहीं मानता...’, असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
टाईम या पत्रकात या निवडणूकांवर लेख लिहिला गेला आहे. ज्यात मोदींचे हिंदू राष्ट्रवादी विचार आता आणखी धोकादायक होतील, असे म्हटले गेले आहे. महेश भट्ट यांनी हाच लेख शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. ऐसे दस्तूर को, सुबहे बेनूर को, मैं नहीं मानता, मैं नहीं मानता...’, असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यासोबतच मोदींनी धोकादायक हिंदू राष्ट्रवादाच्या विचारांना चालना दिली आहे. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हे विचार आणखी प्रखर होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
यानंतर भट्ट सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. ये जलन है कोई जज्बात नहीं। मुल्क में मुश्किल कोई हालात नहीं। तेरी रायशुमारी फिजूल है भट्ट। क्योंकि, तेरी कोई औकात नहीं, असे एकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर एका महिलेने स्वाभिमान का बहता जो रणभूमि में, हम में वही रक्त हैं। खानदानी गुलाम वो बने रहें, गर्व है कि हम मोदी भक्त हैं, असं ट्विट करत महेश भट्ट यांना टोला लगावला आहे.