महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लव्ह-जिहाद सारख्या घटनांना महाराष्ट्राने आजवर थारा दिला नाही - उर्मिला मातोंडकर

महाराष्ट्र धर्म हा सर्वात महत्वाचा धर्म आहे. महाराष्ट्राने आजवर लव जिहाद सारख्या गोष्टींना थारा दिलेला नाही. कुठल्याही जाती धर्माच्या पुरुष अथवा स्त्रियांवर अन्याय होत असतील तर ते चुकीचे आहे. काही लोकं याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करतात. त्यामुळे एक समाज म्हणून आपलं काही चुकत आहे का याचा विचार आपल्याला करावा लागणार असल्याचे मत शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

urmila-matondkar
उर्मिला मातोंडकर

By

Published : Jul 12, 2021, 9:19 PM IST

ऊर्मिला मातोडकर यांच्या हस्ते आज पुण्यात शिवसेनेच्या सर्व संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि शिवसेनेचे प्रदूषण करणाऱ्या महिलांना सदस्य नोंदणी पत्रक देण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

ऊर्मिला मातोडकर म्हणाल्या, कोरोनाच्या काळात शिवसेनेने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मोठे काम केले आहे. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचावी आणि या माध्यमातून गरीब महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी शिवसेनेचे आहे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. कोविडच्या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले आहे.

उर्मिला मातोंडकर

या काळात त्यांच्याशिवाय चांगला माणूस दुसरा कोणी मिळाला नसता. जिथे जिथे महिलांवर अत्याचार होतात तिथे आवाज उठवण्यासाठी शिवसेना तत्पर असते. शिवसेना महिलांच्या पाठीमागे कायमपने उभी राहिल असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर आज सकाळी टीका करताना संजय राऊत हे सोनिया सेनेचे प्रवक्ते असल्याचे म्हटले होते. याविषयी विचारले असता उर्मिला मातोंडकर म्हणाल्या संजय राऊत यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ते समर्थ आहेत. ते रॉकस्टार आहे असे म्हणत मातोंडकर यांनी संजय राऊत यांची पाठराखण केली.

पदासाठी राजकारणात नाही

राज्यपालांकडे प्रलंबित असणाऱ्या बारा आमदारांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता ऊर्मिला मातोडकर म्हणाल्या, राज्यपालांनी यादी मंजुर केली तर एमएलसी बनायला आवडेल. पण मी कोणत्याही पदासाठी राजकारणात आलेली नाही. मी माझं काम आधीपासून करते आहे आणि करत राहील.

हेही वाचा - ''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना'': ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details