महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'धकधक गर्ल' माधुरीने उलगडले फिटनेसचे रहस्य, फिटनेसचे ३ व्हिडिओ केले शेअर - माधुरी दीक्षितचे योगा अभ्यास व्हिडिओ

२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने (International Yoga Day 2021) माधुरी दीक्षितने काही आरोग्य लाभदायक आसनांचे तीन व्हिडिओ शेअर केले आहेत. रोज एक प्रमाणे तिने हे व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केले. धकधक गर्लचे हे व्हिडिओ खूपच लाभ देणारे असल्याच्या प्रतचिक्रिया चाहते कॉमेंट करुन देत आहेत.

International Yoga Day 2021
माधुरीने उलगडले फिटनेसचे रहस्य

By

Published : Jun 21, 2021, 10:25 PM IST

आपल्या अभिनय आणि नृत्याने लाखोंच्या अंतःकरणावर राज्य करणारी माधुरी दीक्षित आजही आपल्या तंदुरुस्तीमुळे चर्चेत असते. वयाच्या ५४ व्या वर्षीही माधुरीकडे पाहिले तर असे वाटते की वय तिच्यासाठी केवळ एक संख्या आहे. माधुरी दीक्षित तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या फिटनेससंदर्भात अनेकदा व्हिडिओ शेअर करते. अलीकडेच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी (International Yoga Day 2021)माधुरीने तिचे ३ व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये तिने आपल्या चाहत्यांना योग साधनेला आपल्या आयुष्याचा एक भाग बनविण्यासाठी प्रेरित केले आहे. ती रोज एक व्हिडिओ शेअर करीत आली आहे.

दुसऱ्या दिवशी माधुरीने धनुरासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे योग आसन नियमितपणे केल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर मात करता येते. यामध्ये आम्लता, गॅस, आंबट ढेकर येणे आणि पोटातील सामान्य वेदना यासारख्या समस्यांचा समावेश आहे. मात्र ज्या लोकांना पोटात अल्सर आहे त्यांनी हे योग आसन करू नये. धनुरासनाचा अभ्यास केल्याने पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनतो.

तिसर्‍या दिवशी माधुरीने योग मुद्रा आसन करतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.योग मुद्रा आसन हे पोट आणि पाठ यााच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. हे आसन नियमित केल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळतो.

हेही वाचा - भेटा अक्षय कुमारच्या चार बहिणींना!

ABOUT THE AUTHOR

...view details