मुंबई (महाराष्ट्र)- अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नेटफ्लिक्सच्या आगामी 'द फेम गेम' या मालिकेतून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. करण जोहर-समर्थित या मालिकेत माधुरीला अनामिका आनंद या बॉलिवूड आयकॉनच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. शोच्या व्हर्च्युअल ट्रेलर लाँच दरम्यान माधुरीने सांगितले की तिला या मालिकेचा आधार वाटला आणि ती लगेचच तिच्या जगाकडे आकर्षित झाली.
"मला स्क्रिप्ट आवडली. यातील मी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचा प्रवास खूप आवडला. जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रसिद्धी येते तेव्हा कोणत्या तरी चुकीच्या गोष्टी आणि गुंतागुंती होऊ शकतात. ही एक अशा महिलेची कथा आहे जिचे आयुष्य वरवर परिपूर्ण दिसते. एके दिवशी ती गायब होते आणि सर्वांना आश्चर्य वाटते. तिला काय झाले, ती कुठे आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो.
"मग, 'ती कुठे आहे?' बदलून 'ती कोण आहे?' ती कोण आहे हे लोकांना ठाऊक आहे का? ती स्वतःला ओळखते का? कारण सर्वांनी तिला पडद्यावर पाहिले आहे, लार्जर दॅन लाइफ पती आणि मुलांसह परिपूर्ण जीवन जगत आहे. ती तिच्या व्यवसायात पूर्णपणे स्थिर होती. मग काय? तिच्यासोबत काय घडलं? मला वाटलं की हे खूप वेधक आहे. त्यामुळे मला खूप आकर्षण वाटलं," असं मालिकेच्या कथेबद्दल सांगताना माधुरी म्हणाली.