मुंबई :गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ती आज न्यायालयात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.
आज अंधेरी कोर्टात सुनावणी
जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे अंधेरी कोर्टात हजर होणे कंगानाला अनिवार्य होते. १४ सप्टेंबरला याबाबत सुनावणी झाली असता कंगनाला कोरोनाचे लक्षणे आढळली. तिची कोविड चाचणी झाली. रिपोर्टसाठी विलंब होत असल्याचे कंगनाचे वकील ऍड सिद्दिकी यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील ऍड भारद्वाज यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सुनावले आणि सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.