मुंबई - सध्या लॉक डाऊन सुरू असल्या मुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर धमाल व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. काहीजण या वेळेत आपले छंद जोपासत आहेत. तर काही घरचे काम करण्यात व्यग्र आहेत. अभिनेता कुणाल खेमु देखील पत्नी सोहा आली खान आणि मुलगी इनाया यांच्यासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान सोहाने त्यांचा एक मजेदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
कुणाल खेमुचा 'वखरा स्वॅग', पहा मजेदार व्हिडिओ - soha ali khan
कुणालच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
कुणाल खेमुचा 'वखरा स्वॅग', पाहा मजेदार व्हिडिओ
कुणाल या व्हिडिओमध्ये 'वखरा स्वॅग' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसतो. सोहाने या व्हिडिओवर दिलेल्या कॅप्शनमुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. 'कुणाल नेमकं वजन कमी करत आहे, की त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय हे तुम्हीच व्हिडिओ पाहून ठरवा, अशी कॅप्शन सोहाने दिली आहे.
कुणालच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.