महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

करण जोहरच्या 'दोस्ताना 2'सह सर्व चित्रपटातून कार्तिक आर्यनला डच्चू? - कार्तिक आर्यन ताजी बातमी

कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी आगामी 'दोस्ताना 2' या चित्रपटासाठी शूट सुरू केले होते. मात्र या चित्रपटातून कार्तिकला हटवण्यात येत आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या इतर आगामी चित्रपटातूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

KJo ousts Kartik Aaryan
कार्तिक आर्यनला डच्चू?

By

Published : Apr 16, 2021, 4:28 PM IST

मुंबई- बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन आणि चित्रपट निर्माता करण जोहर हे एकमेकांपासून विभक्त होत आहेत अशी चर्चा रंगली आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या आगामी चित्रपटातूनही तो बाहेर पडला आहे.

इंडस्ट्रीतील ताज्या चर्चानुसार कार्तिकला दोस्ताना 2 मधून काढून टाकण्यात येत आहे, यासाठी त्याने जान्हवी कपूरसोबत आधीच शूट केले होते. करणजोहरच्या अवाजवी वागण्यामुळे चित्रपटाचा दिग्दर्शक कॉलिन डिकुन्हा नाराज असून कार्तिकच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड त्याने केली आहे.

मिळालेल्या अहवालानुसार कार्तिक आर्यन हा इनप्रोफेशनल वागत असल्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या इतर चित्रपटातूनही त्याला हटवले जाणार आहे. कार्तिक चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यासाठी तारखा देत नसल्यामुळे निर्मात्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. असेही म्हणतात की त्याने चित्रपटाच्या उर्वरित भागाच्या पटकथेबाबतही काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

हेही वाचा - मनोरंजनसृष्टीला अत्यावश्यक सेवा म्हणून मानले जावे; IFTPC ची मागणी!

ABOUT THE AUTHOR

...view details