मुंबई- भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा गुरूवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री किर्ती कुल्हारीनं त्या पाच महिला वैज्ञानिकांपैकी एकीची भूमिका साकारली होती, ज्यांचा मंगळ मोहिमेच्या यशात मोठा वाटा आहे. आता क्रितीनं अक्षयसोबत काम करतानाच आपला अनुभव शेअर केला आहे.
सेटवर खेळतं वातावरण ठेवतो अक्षय, क्रिती कुल्हारीनं केलं सहकलाकाराचं कौतुक - चित्रपटसृष्टी
अक्षय सेटवर मस्ती न करता एक क्षणही राहू शकत नाही. सतत तो काही न काही करत असतो. तुम्ही जर त्याच्या संपर्कात आहात तर त्याच्यातील ऊर्जा आपोआपच तुम्हाला कामसाठी प्रेरणा देते, असं किर्ती कुल्हारी म्हणाली.
अक्षय सेटवर मस्ती न करता एक क्षणही राहू शकत नाही. सतत तो काही न काही करत असतो. तुम्ही जर त्याच्या संपर्कात आहात तर त्याच्यातील ऊर्जा आपोआपच तुम्हाला कामसाठी प्रेरणा देते. तो कधीच तुम्हाला गंभीर होऊ देत नाही, असं किर्ती कुल्हारी म्हणाली.
यासोबतच तिनं विद्या बालनचंही कौतुक केलं. विद्यानं या सिनेमात तारा शिंदे नावाच्या महिला वैज्ञानिकाची भूमिका साकारली आहे. मला नाही वाटत चित्रपटसृष्टीत अशी कोणी व्यक्ती असेल, ज्याला विद्या बालन प्रेमळ वाटतं नसेल, असं किर्ती म्हणाली. किर्तीनं या सिनेमात नेहा सिद्दीकी हे पात्र साकारलं आहे. एका वैज्ञानिकासोबतच नवऱ्यासोबतचा घटस्फोट आणि विभक्त झाल्यामुळे घर घेण्यासाठीही तिला करावी लागणारी धडपड या सर्वातून जाणाऱ्या नेहाची कथा यात पाहायला मिळते.