हैदराबाद - दक्षिणात्य अभिनेता यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'KGF - Chapter 2' च्या ट्रेलरची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या महिन्याच्या २७ तारखेला संध्याकाळी ६.४० वाजता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा चित्रपट यावर्षी 14 एप्रिल रोजी तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतीय चित्रपट उद्योगात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग पाहण्याची चाहत्यांची अस्वस्थता गेल्या चार वर्षांपासून कायम आहे.