मुंबई- अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'केसरी' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. ऐतिहासिक लढ्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २१.०६ कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा अक्षयचा दुसराच चित्रपट ठरला.
प्रेक्षकांवर 'केसरी'चा रंग, ७ दिवसात पार केला १०० कोटींचा गल्ला
'केसरी' हा चित्रपट सारागढीच्या लढाईवर आधारित आहे. २१ शिख सैनिकांनी १० हजार अफगाणींविरोधात दिलेल्या लढ्याची कथा ‘केसरी’मध्ये आहे.
या पाठोपाठ आता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्लादेखील पार केला आहे. केवळ ७ दिवसात चित्रपटाने हा आकडा गाठला आहे. याआधी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या रणबीरच्या 'गली बॉय'ने आठव्या दिवशी तर अजयच्या 'टोटल धमाल'ने ९व्या दिवशी हा आकडा पार केला होता. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाने अजय आणि रणबीरलाही मागे टाकले आहे.
'केसरी' हा चित्रपट सारागढीच्या लढाईवर आधारित आहे. २१ शिख सैनिकांनी १० हजार अफगाणींविरोधात दिलेल्या लढ्याची कथा ‘केसरी’मध्ये आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे. तर परिणीती चोप्राने यात अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.