महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

vicky weds katrina : हिऱ्या-सोन्याने जडवलेल्या लेहेंग्यात कॅटरिना कैफ बनली नववधू, घातली 'इतक्या' लाखाची अंगठी - Famous Fashion Designer Sabina's Lehenga

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाचीने कॅटरिना कैफचा लेहेंगा आणि विकी कौशलची शेरवानी डिझाइन केली. कॅटरिनाने लग्नात डायमंडने जडलेले मंगळसूत्र आणि एंगेजमेंट रिंग घातली होती.

कॅटरिना कैफ बनली नववधू
कॅटरिना कैफ बनली नववधू

By

Published : Dec 10, 2021, 4:04 PM IST

मुंबई - बॉलीवूडमध्ये स्टार जोडपे लग्न करतात तेव्हा त्यांच्या लग्नातील पोशाख आणि मौल्यवान दागिन्यांची चर्चा होत नाही, असे होऊ शकत नाही. बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय ते प्रियांका चोप्रापर्यंत, त्यांच्या शाही विवाहासाठी आणि लग्नाच्या पोशाखांसाठी लाखो खर्च झाल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. आता कॅटरिना कैफच्या लग्नातील बहुमोल लेहेंगा आणि दागिन्यांची चर्चा जोरात सुरू आहे.

कॅटरिना कैफ बनली नववधू

बॉलीवूडमधील जोडप्यांचे बहुतेक लग्नाचे पोशाख प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केले आहेत. सब्यसाचीने अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे डॅशिंग लेहेंगा आणि दागिने डिझाइन केले आहेत. सब्यसाचीने कॅटरिना कैफच्या लग्नातील पोशाख आणि दागिने देखील डिझाइन केले आहेत. यासोबतच विकी कौशलची शेरवानीही सब्यसाचीने तयार केली आहे.

कॅटरिना कैफ बनली नववधू

कॅटरिना कैफचा अनकट डायमंड लेहेंगा

एका इंग्रजी पोर्टलनुसार, कॅटरिना कैफच्या लग्नातील लेहेंगा डिझाइन करणारे प्रसिद्ध फॅशन डिझाईन सब्यसाची मुखर्जी यांनी सांगितले की, 'कॅटरिना कैफने क्लासिक लाल आणि हाताने बनवलेला मटका सिल्क डिझाईनचा लेहेंगा घातला होता, यावर जरदोजी मखमली बॉर्डर तयार करण्यात आली होती.'

पंजाबी चालीरीतींनुसार, लेहेंग्यामधील घुंघट सोन्याने आणि इलेक्ट्रोप्लेट (हाताने मारलेल्या चांदीने) सजवला होता. लेहेंगा सब्यसाचीच्या क्लासिक ज्वेलरीमधील बेस्पोक वधूच्या दागिन्यांसह डिझाइन केला आहे, हस्तकलेने तयार केलेले मोती आणि न कापलेल्या हिऱ्यांसह 22 कॅरेट सोन्यात सेट आहे.

कॅटरिनाची एंगेजमेंट रिंग

कॅरिनाच्या एंगेजमेंट रिंगबद्दल बोलायचे झाले तर तिची किंमत 7.41 लाख रुपये आहे, जी प्रिन्सेस डायनाच्या आयकॉनिक सॅफायर रिंगसारखी दिसते. ही हिऱ्याची अंगठी आहे, जी नीलमणीने जडलेली आहे.

कॅटरिना कैफ बनली नववधू

कॅटरिनाचे डायमंड मंगळसूत्र

कॅटरिना कैफचे डायमंड मंगळसूत्र सब्यसाचीच्या बंगाल टायगर कलेक्शनमधून बनवले आहे. मंगळसूत्र काळ्या आणि सोन्याच्या मणींनी जडलेले आहे आणि तळापासून दोन हिऱ्यांच्या मणींनी सुशोभित केलेले आहे.

कॅटरिना कैफ बनली नववधू

विकी कौशलची डॅशिंग शेरवानी

विकी कौशलच्या शेरवानीबद्दल सांगायचे तर, ती सब्यसाचीने तयार केली आहे. सब्यसाचीने सांगितले, 'विक्की कौशलने लग्नासाठी हस्तिदंती सिल्क शेरवानी घातली होती, ज्यात हाताने बनवलेल्या सोन्याच्या बंगाली टायगर बटन्स होत्या. शेरवानी सिल्क कुर्ता आणि चुरीदारसह सेट होती. विकीच्या लग्नाची शाल तुषार जॉर्जेटची आहे, पल्लू आणि बॉर्डरवर जरी मरोरा भरतकाम केलेला आहे. त्याच बरोबर सोन्याचा बनारसी सिल्क टिश्यू सफा, हाताने बनवलेली किलंगी, गळ्यात माळा, गुलाब कट हिरा आणि 18 कॅरेट सोन्यापासून बनवले आहे.

हेही वाचा - Vikcy Weds Katrina : सलमान खान आणि रणबीर कपूर सोडून इतर बॉलिवूडकरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details