मुंबई - अभिनेता हर्षवर्धन कपूरने अलिकडेच एका टीव्ही कार्यक्रमात चाहत्यांशी बोलताना कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या रिलेशनबाबतचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर सर्वच माध्यमांनी बातम्या केल्या आणि या प्रेम प्रकरणाची चर्चा केली. यानंतर विकीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी कॅटरिना कैफ मात्र नाराज असल्याचे समजते.
''सध्या सुरू असलेल्या अफवांपैकी कोणत्या जोडीचे प्रेम प्रकरण अफवा नसून खरे आहे?", असा प्रश्न हर्षवर्धनाला चॅट शोमध्ये विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना तो म्हणाला, "विक्की आणि कॅटरिना एकत्र आहेत, हे खर आहे." पण लगेचच तो म्हणाला, "यासाठी मी त्यांना अडचणीत तर आणत नाही ना?"
नेमके हर्षवर्धन म्हणाला तसेच घडलंय. त्याच्या या विधानामुळे कॅटरिना कैफची अडचण वाढली आहे. रिपोर्टनुसार कॅटरिनाने थेट प्रसिध्दी माध्यामांकडे प्रतिक्रिया दिलेली नसली तरी तिच्या जवळच्या सूत्राने सांगितले आहे की ती नाराज झाली आहे.