मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. १९८० ते १९९० च्या दरम्यान काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांकडून झालेले पंडितांवर आत्याचार ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दाखवले आहे. आतापर्यंत कर्नाटकसह, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांत हा चित्रपट करमुक्त केला आहे. आता महाराष्ट्रातही हा चित्रपट करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करावा - भाजप नेत्यांची मागणी
दरम्यान आता भाजप नेते महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित ‘द कश्मीर फाइल्स’ ( The Kashmir Files ) हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे यासाठी मागणी केली आहे.
kashmir files