मुंबई - बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यनची बहीण क्रितिका तिवारीचा बुधवारी वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकने स्वतः बिस्कीट केक बनवला होता. सध्या कोरोनामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नाहिये. त्यामुळे कलाकारांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवता येत आहे.
7 वर्षानंतर कार्तिकने एकत्र साजरा केला बहिणीचा वाढदिवस, स्वतः बनवला केक - kartik aryan celebrates his sister birthday
कार्तिकने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7 वर्षानंतर कार्तिकने एकत्र साजरा केला बहिणीचा वाढदिवस, स्वतः बनवला केक
तब्बल सात वर्षानंतर कार्तिकने आपल्या बहिणीचा एकत्र येऊन वाढदिवस साजरा केला, त्यामुळे त्याने आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे.
लॉकडाऊनचा फायदा, छोटा केक बनवता बनवता मोठं बिस्कीट तयार झालं. मात्र, 7 वर्षानंतर क्रितिकाचा वाढदिवस एकत्र साजरा करता आला, असे कार्तिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.