मुंबई- करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली असताना आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा असल्याचं सारानं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्याही नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून हे कलाकार अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.
कार्तिक-सारा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट, पारंपारिक वेशभूषेत दिसली सैफची लाडकी - affair
कार्तिक-सारा ही जोडी लवकरच इम्तियाज अलीच्या एका आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार असून चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओही अनेकदा समोर येत असतात.
कार्तिक-सारा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट
ही जोडी लवकरच इम्तियाज अलीच्या एका आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार असून चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओही अनेकदा समोर येत असतात. अशात आता हे कपल मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालं. मीडियाचे कॅमेरे समोर पाहताच कार्तिक आणि साराच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं.
आपल्या पारंपारिक लूकसाठी ओळखली जाणारी सारा यावेळी पांढऱ्या रंगाच्या चुडीदारमध्ये दिसली. तर कार्तिक पांढरा टी शर्ट आणि रेड जॅकेटमध्ये दिसला. पाहा त्यांचा हा खास लूक