नाशिक- नाशिक रोड येथील सेंट झेवियर चर्च येथे करीना-करिश्मा आणि बबिता कपूर तसेच त्यांचे नातेवाईक यांनी येऊन बाळ येशूचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. बाळ येशूचे दर्शन घेण्यासाठी कपूर कुटुंबीय विमानाने मुंबईहून नाशिकच्या ओझर विमानतळावर आले आणि ओझरहून नाशिक- पुणे रोड येथील सेंट झेव्हीयर चर्च येथे बाळ येशूचे दर्शन घेण्यासाठी हजर झाले.
करिना-करिश्मा अन् बबिता कपूरनं घेतलं नाशिकमधील बाळ येशूचे दर्शन
कार्यालयीन कर्मचारी वर्ग आणि सुरक्षारक्षकांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. यावेळी धर्मगुरू फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली
सकाळी ११ वाजता त्यांचे सेंट झेवियर्स चर्च येथे आगमन झाल्यावर नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. कार्यालयीन कर्मचारी वर्ग आणि सुरक्षारक्षकांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. करीना कपूर, करिश्मा कपूर त्यांची आई बबिता कपूर तर करिश्मा कपूर यांची मुले आणि मित्र यावेळी बाळ येशूच्या चरणी लीन झाले.
यावेळी धर्मगुरू फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. बाळ येशूच्या स्मरणार्थ बांधलेले हे मंदिर म्हणजे ख्रिस्ती धर्मातले धार्मिक अधिष्ठान आहे. जगभरातून लोक या मंदिरात येऊन बाळ येशू चरणी लीन होतात. येथे वर्षातून एकदा होणारी तीन दिवसीय यात्रा म्हणजे भारतातल्या लोकांना धार्मिक पर्वणीच असते.