गेल्या वर्षी स्टार-किड्स आणि इतर कलाकार यावर बरंच चर्वितचर्वण झाले होते. करण जोहर, जो जवळपास सगळ्या स्टार-किड्सना लाँच करण्यासाठी ओळखला जातो, त्यांची पाठराखण करताना दिसला व त्यामुळे ट्रोलही झाला. परंतु आता नवीन वर्ष सुरु झालंय आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. करण जोहर अजून एका स्टार कीडला लाँच करण्यास सज्ज झाला आहे. स्टार-किड्सचा संरक्षक करण जोहर आपल्या बॅनर ‘डीसीए स्क्वाड’ तर्फे अजून एक स्टार किड घेऊन येत आहे.
करण जोहर बॉलिवूडमध्ये घेऊन येतोय अजून एक स्टार-कीड, शनाया कपूर! - शनाया कपूर कपूर करणार बॉलिवूड पदार्पण
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करण जोहर तिला आगामी सिनेमात संधी देत आहे. धर्ममा प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातून ती रुपेरी पडद्यावर अवतरेल.
हेही वाचा - टायगर श्रॉफ सुरु करतोय ‘हिरोपंती २’ चे शूटिंग!
शनायाची आई महीप कपूरनेदेखील काही महिन्यांपूर्वी ‘फॅबुलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाईव्ह्ज’ मधून अभिनय-पदार्पण केले होते व त्या शोचा निर्माता देखील करण जोहरच होता. आईपाठोपाठ करण आता तिच्या मुलीच्या पदार्पणातही मदत करतोय. शनायाचे एक काका बोनी कपूर निर्माते आहेत, दुसरा काका अनिल कपूर सुपरस्टार आहे तसेच तिचे चुलत भाऊ-बहीण अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर, हर्षवर्धन कपूर आणि सोनम कपूर अहुजा चित्रपटसृष्टीत जम बसवून आहेत. त्यातच तिचे वडील संजय कपूर सुद्धा सध्या अभिनयाची दुसरी इनिंग्स खेळताहेत. घरातच एव्हडे स्टार्स असताना शनायाला स्टारडम मिळविणे फारसं जड जाऊ नये.
हेही वाचा - ‘कोण होणार करोडपती' ला मिस्ड कॉल म्हणजे एक करोडचा कॉल!